Categories
festival

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, बॅनर, फोटो डाउनलोड, दिवाळीची माहिती मराठी मध्ये, SMS, स्टेटस, images, HD images

आजचे जग वेगाने वैज्ञानिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.
आजच्या या धावपळीच्या जीवनातही मानवाच्या मनात सांस्कृतिक बीजे रोपली गेली आहे असे निर्दशनास येते.
मानवाने कितीही प्रगती केली तरीही परंपरे शिवाय, संस्कृती शिवाय समाधानी राहू शकत नाही याचे उदाहरण म्हणजे भारत.
आजही भारतात पूर्वीच्याच पद्धतीने सर्व सण साजरे केले जातात.
प्रत्येक सणामागे काहीना काही वैज्ञानिक कारण आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आकर्षित होत आहे.
दिवाळी हा आपला सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. हा सण म्हणजे दिव्यांचा सण.
दिवाळीला तेलाचे दिवे लावले जातात कारण या काळात वातावरण शुद्ध राखण्यास तसेच उष्णता निर्माण करण्यास यांची फार मदत होते.
या सणाची आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत असतो.

दिवाळी कधी साजरी करतात?

अश्विन महिन्याचे शेवटचे ३ दिवसकार्तिक महिन्याचे पहिले २ दिवस असे ५ दिवस हा सण साजरा करतात.
तसे बघितले तर अश्विन एकादशी पासूनच दिवे लावण्यास सुरवात करतात.
दुसऱ्या दिवशी वसुबारस म्हणजे सुवासिनी गाय वासरांची पूजा करतात.

दिवाळीचा पहिला दिवस: धनत्रयोदशी 

या दिवशी धन्वंतरीची (धनाची) पूजा करतात.
यमदीपदान याच दिवशी केले जाते.

दिवाळीचा दुसरा दिवस: नरक चतुर्दशी 

या दिवशी श्री कृष्णाद्वारे नरकासुसराचा वध केला गेला अशी मान्यता आहे.
काही ठिकाणी या दिवशी नरकासुराच्या नावाने चार वातीचा दिवा दक्षिण दिशेला लावून आनंद व्यक्त केला जातो.

दिवाळीचा तिसरा दिवस: लक्ष्मी पूजन 

या दिवशी व्यापारी आणि गृहस्थी लोक लक्ष्मी मातेचे पूजन करतात.
या दिवशी घरातील सर्व लहान मोठे मातेच्या स्वागताला सज्ज असतात.
या दिवशी सर्वांच्याच घरात आनंद सोहळा साजरा केला जातो.
पूजेसाठी देवीची मूर्ती किंवा फोटो खरेदी केला जातो.
फळे, फुले, सुगंधी अगरबत्ती अशी अनेक प्रकारची पूजा सामग्री आणली जाते.
ह्या साहित्या मध्ये महत्वाची केरसुणी असते.
तिचीही ह्या दिवशी पूजा करतात.
देवीला पाच पकवान याचा नैवद्य अर्पण केला जातो.

दिवाळीचा चौथा दिवस: बली प्रतिपदा 

हा दिवस व्यापारी लोकांचा पाडवा म्हणून ओळखला जातो.
काही ठिकाणी या दिवशी सुवासिनी आपल्या पतीचे औक्षण करतात.

दिवाळीचा पाचवा दिवस: भाऊबीज 

भाऊबीज हा दिवस म्हणजे बहीण भावाचा दिवस. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला आणायला जातो.
सासरहून माहेरी जाण्यासाठी बहीण भावाची आतुरतेने वाट बघत असते.
या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळीत असते आणि भावाच्या चांगल्या जीवनाची कामना करते.
दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी मेजवानीच असते.
शाळेला सुट्टी असते. त्यामुळे बरीचशी मुले मामाच्या गावाला जातात.
सणानिमित्त बनवलेल्या फराळाचा (लाडू, करंजी, चकली, शेव चिवडा, शंकरपाळे, इ) आनंद घेत असतात.
लहान मुलांसाठी नवीन कपडे खरेदी केले जातात. लहान मुले फटाके आणून आनंद साजरा करतात.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन कपडे आणि दागिने खरेदी केली जातात.
त्या बरोबरच नवीन वाहने खरेदी करणे तसेच दुकानांचे उदघाटन आणि भूमिपूजन देखील केले जाते.
दिवाळीत दीपमाळा व आकाशदिवा आपल्याला घरोघरी दिसतात.
सर्व परिसर प्रकाशाने उजळून निघतो. सुख, शांती आणि समाधानाची हि ज्योती कायम तेवत राहो, या प्रकाशाने सर्वांचे जीवन उजळून निघो हि लक्ष्मीचरणी प्रार्थना करतात. 

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, HD PNG फोटो डाउनलोड

 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर/फोटो  १ (फोटो HD  quality मध्ये डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करून होल्ड करा, तुम्हाला डाउनलोड किंवा save  फोटोचे ऑपशन दिसेल.)

Diwali wishes in Marathi 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर/फोटो  २ (फोटो HD  quality मध्ये डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करून होल्ड करा, तुम्हाला डाउनलोड किंवा save  फोटोचे ऑपशन दिसेल.)
Diwali padvyachya shubhechha in Marathi
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर/फोटो  ३ (फोटो HD  quality मध्ये डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करून होल्ड करा, तुम्हाला डाउनलोड किंवा save  फोटोचे ऑपशन दिसेल.)
Diwali greetings Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा SMS (Diwali Shubhechha Sandesh)

आनंद आणि उल्हास ओसंडून वाहू दे,

या दिवाळीला सर्वना स्वास्थ्य आणि आरोग्य लाभू दे!
|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||

सूर्याप्रमाणे कांती यावी आपल्या घरी,
सुखाचे तोरण लागो प्रत्येक दारी,
दिवाळीच्या दिव्याप्रमाणे तेजोमय व्हावे तुमचे आयुष्य सारे,
लाख लखत्या प्रकाशाने नष्ट व्हावा अंधकार सारा,
नव चैतन्य खुलून यावे,
आनंदाने बहरून जावे अवघे घर,
या दिवाळीच्या सुखद पावलांनी मंगलमय व्हावे जीवन सारे!
|| दिवाळीच्या मनापासून मनापर्यंत शुभेच्छा ||

एक दिवा उमंगाचा

एक दिवा आनंदाचा
एक दिवा लक्षमीचा
एक इवा नारायणाचा
प्रत्येक दिवा मांगल्याचा
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

फटाक्यांचा आवाज दुमदुमला
कारंजी थोडी घाबरली
लादून तिला सावरली
चिवडा हळूच म्हणाला
अरे! लक्षमीपूजनाचा दिवस आला
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

धनप्रायोदशीने सुरवात केली
उटणं लावून अंघोळ झाली
लक्षमीपूजनाची वेळ आली
भाऊबिजेने सांगता केली
अशी दिवाळी साजरी झाली
|| दिवाळी परवाच्या हार्दिक शुभेच्छा ||

या दिवाळीला माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या, हि आपल्या भरभराटीची जावो व आपल्या जीवनातील सुखशांती अशीच कायम राहो हीच सदिच्छा.

|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

सुगंधित उटण्याची, चवदार फराळाची, आकाशकंदील व फटाक्यांची, लाख लखत्या दिव्यांची, अशी चाहूल लागते दीपावलीच्या सणाची, हिंदुत्वाच्या मानबिंदूची.
|| दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ||

दिव्यांनी उजळलेले हे घर असेच आनंदाने फुलत राहो, हि दिवाळी आपल्याला सुख, समृद्धी आणि शांततेची जावो. 
|| दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा || 

इडा पीडा  जाऊन बळी च राज्य येण्यासाठी दिलेला आशीर्वाद फळाला येऊ दे!
भाऊ बहिणीचा प्रेम सतत वाढत जाऊ दे.
|| भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ||

पणतीच्या नाजूक प्रकाशझोतामध्ये रांगोळी खुलून हसत आहे, कारण दिवाळी आली आहे!
स्वतः जळून इतरांना सुखावत आहे,  कारण दिवाळी आली आहे!
पणतीचा शीतल प्रकाश लक्ष्मीची साक्ष देत आहे!
हे सर्व बघून आकाशकंदील मनोमन आनंदित होत आहे, कारण दिवाळीचा सण आला आहे!
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

सोनेरी रंगाचा सडा घरात शिंपला
सण  हा पावित्र्याचा दारी अवतरला
||दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

तेजस्वी सणाच्या लखलखत्या शुभेच्छा
सर्व हेवे देवे बाजूला सारून मोकळी स्पंदने दाटली दीपोत्सवाची ओढ लागली, आनंदात सगळे न्हाऊन गेले, स्नेहाची पाहत झाली, अशी दिवाळी अवतरली.
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

सर्व संकटांना सामोरे जाण्याची शक्ती माता लक्ष्मी तुम्हाला देवो!
या दिवाळीला तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो!
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेछया ||

शुद्धतेची भावना मनामनात रुजली
समाधानाने सगळी मन सजली
चैतन्याचे पर्वा साजरे करण्याची वेळ अली
|| दिवाळीच्या हार्दिक शुभेछया ||